हवामान बदल संबंधित साधने

मानवाच्या कृत्यांमुळे हवामान बदल होत आहेत. या बदलांमुळे पाऊस, तापमान आणि पर्यावरणातील हवामान यांच्यातले नाजुक संतुलन बिघडू शकते आणि त्यामुळे मानवी आरोग्य, जैवविविधता आणि पुढील पिढ्या ह्यांच्यावर अकल्पित परिणाम होऊ शकतात.

त्यामुळे हवामान बदलाची समस्या सोडवण्याकरता सर्व पातळींवर काम सुरू झाले पाहिजे. आंतरराष्ट्रीय गटांमध्ये सामाईक जबाबदारीवरील चर्चा एक दशकाहून अधिक काळ चालू आहे.

हवामान बदलाविषयी प्रसार माध्यमांतून बरीच वर्षं बोललं जात आहे. आणि ह्या बदलाच्या परिणामांची माहिती वेगवेगळ्या भागीदारांना दिली गेली आहे. परंतु जेव्हा काही करण्याची वेळ येते तेव्हा ते प्रामुख्याने वैज्ञानिक गटांपर्यंतच मर्यादित राहतं. ह्या आणि संबंधित विषयांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी काही साधने तयार केली गेली पण ती बहुतांशी विकसित राष्ट्रांच्या संदर्भात आहेत. भारतात, सामान्य माणसाला उद्देशून फार कमी बोललं गेलं आहे. हवामान बदलाच्या समस्येला सामोरं जायचं असेल तर सर्व भागीदारांनी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत आणि याकरता जागरूकता निर्माण करणे आणि माहितीचा प्रसार अतिशय महत्वाचे आहे.

मुंबई महानगर क्षेत्रातील लोकसंख्येची दाटी अतिशय जास्त आहे आणि त्यात शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागांतील लोकांचा समावेश आहे. हे लक्षात घेऊन एनव्हायरन्मेंटल मॅनेजमेंट संटर एल.एल.पी.(EMC LLP) नी MMR-EISच्या साहाय्याने एका प्रकल्पाची योजना केली. त्याअंतर्गत खालील भागीदारांसाठी साधने तयार करण्यात आली :

  • पोलिसी-मेकर्स्
  • नागरिक
  • शाळा आणि महाविद्द्यालयातील विद्यार्थी
  • औद्द्योगिक आणि व्यावसायिक कर्मचारी

या संप्रेषण साधनांना हवामान बदल संबंधित साधने असे म्हटले जाते.

प्रशिक्षक आणि संवादक यांच्यासाठी खालील साधने उपलब्ध आहेत:

  • फॅक्टशीट्स
  • प्रशिक्षण साधने (पी.पी.टी.)
  • पोस्टर्स
  • स्टिकर्स
  • हवामान बदल कॅलेंडर
  • मुलांसाठी कृती पुस्तिका
  • तरुणांसाठी मार्गदर्शक पुस्तिका
  • एन.ए.पी.सी.सी. विषयी पुस्तिका
  • हवामान बदलाशी संबंधित (मुंबई महानगर क्षेत्रातील) संस्थांचा नकाशा
  • ऑनलाइन कार्बन फुटप्रिंट कॅलक्युलेटर (प्रौढांकरिता आणि मुलांकरिता)
MOD_STATS_USERS : 8
MOD_STATS_ARTICLES : 26